Posted on 2022-11-03
रविवार दि. २९ रोजी सकाळी ११ वाजता पंचमी च्या शुभ मुहूर्तावर डॉ. हेडगेवार रक्त केंद्र रामनगर येथे लक्ष्मी पूजन साजरे करण्यात आले. कार्यक्रमाला TV 18 या नॅशनल चॅनेल चे श्री. रविजी गुळकरी व रविजी कासखेडीकर प्रामुख्याने उपस्थित होते. दोघांनीही रक्त केंद्राचे कामकाज व जागतिक व अत्याधुनिक उपकरणे बघितले नव्हते. आज प्रथमच त्यांनी डॉ. हेडगेवार रक्त केंद्राची वास्तूतील कामकाजाची पाहणी केली व समाधान व्यक्त केले. केंद्रातर्फे त्यांना सेवा कार्याबाबत ची पुस्तके भेट दिली. याप्रसंगी सर्व संचालक उपस्थित होते.